Thursday, 4 July 2019

ख्यातनाम गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांना 'स्वामीरत्न राष्ट्रीय पुरस्कार ' तर मराठी सिनेअभिनेता स्वप्नील जोशी व गीतकार श्री. ना. धों. महानोर यांना 'स्वामीभूषण राज्य पुरस्कार' जाहीर


दिनांक १६ जुलै २०१९ रोजी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या ३२ वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या अक्कलकोट नरेश श्रीमंत विजयसिंहराजे भोसले स्मरणार्थ, "अक्कलकोट निवासी ब्रम्हांडनायकच्या प्रथम वर्षीय 'स्वामीरत्न राष्ट्रीय,  स्वामीभूषण राज्य स्तरीय 'आणि  'स्वामी सेवक जिल्हास्तरीय' पुरस्कार वितरण समारंभात ख्यातनाम गायिका पद्मविभूषण आशा भोसले यांना 'स्वामीरत्न राष्ट्रीय पुरस्कार २०१९' हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम ५ लाख, मानपत्र व सन्मानचिन्ह तर 'स्वामीभूषण राज्य पुरस्कार २०१९' मराठी सिनेअभिनेता स्वप्नील जोशी आणि ज्येष्ठ कवी व गीतकार श्री. ना. धों. महानोर यांना प्रत्येकी  रुपये १ लाख २५ हजार व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हि घोषणा प्रभुकुंज, पेड्डार रोड येथे हृदयनाथ मंगेशकर, श्री. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले, श्री अमोलराजे जन्मेजयराजे भोसले, आदिनाथ मंगेशकर, सुधीर गाडगीळ, कृष्णा मंगेशकर, अनुषा श्रीनिवासन अय्यर ह्यांच्या उपस्थितीत करण्यात आली. 

२९ जुलै १९८८ गुरूपौर्णिमा या दिवशी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाची स्थापना झाली. त्यामुळे श्री गुरूपौर्णिमा आणि वर्धापन दिन हा उत्सव या संस्थानमध्ये विशेषत्वाने आणि भव्य दिव्य प्रमाणात साजरा केला जातो.  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र संस्थानचा धर्म संकिर्तन कार्यक्रम व गुरूपोर्णिमा / वर्धापन दिन उत्सव सबंध महाराष्ट्रात प्रसिध्द आहे. या कार्यक्रमात व उत्सवात भाग घेण्यासाठी हजारो परगांवचे स्वामीभक्त आपली हजेरी लावतात. 

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट यांच्या वतीने ३२ वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून धर्मकिर्तन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक ६ जुलै ते १५ जुलै २०१९ दरम्यान करण्यात येणार असून यंदाचे हे विसावे वर्ष आहे.

हे धर्मादाय न्यास अक्कलकोट येथे स्वामी दर्शनास येणाऱ्या हजारो स्वामीभक्तांना अन्नदान (महाप्रसाद :मोफत भोजन)दररोज दोन्ही वेळेस करीत आहे. येथे १५ ते २० हजारावर स्वामी भक्त महाप्रसादाचा लाभ घेतात. तसेच येणाऱ्या भाविकांच्या निवासाची व्यवस्था यात्रीनिवास, यात्रीभुवन, अतिथी निवास ह्या भव्य इमारतीत चांगल्याप्रकारे Non-A.C., A.C. सुट, डिलक्स व VIP सुटसह केली आहे. हे न्यास सामाजिक बांधिलकी जपत अक्कलकोट शहर विकास कार्यास मोठे योगदान देऊ केले आहे. स्वमालकीच्या विहिरीतून ८ कि.मी. अंतरावरून पाइपलाईनद्वारा पाणी आणून पाणी टंचाईचे काळात सलग ८ महिने दररोज १० लाख लिटर्स पाणी संबंध शहरास पुरवठा केला आहे. हे न्यास गरीब व गरजवंतांना वैधकीय व शैक्षणिक मदत करते. पुरग्रस्त, जळीतग्रस्त, भुकंपग्रस्तांना हे न्यास सदैव मदतीचा हाथ पुढे करते. शैक्षणिक, आरोग्य-विषयक, पर्यावरणपूरक, सांस्कृतिक इ. उपक्रम राबविण्यात अग्रेसर आहे. शासनाच्या विविध योजना व  उपक्रमांना हे न्यास नेहमीच भरीव सहकार्य करते. स्वामी भक्तीच्या प्रचारासाठी न्यासाची श्री स्वामी समर्थ पालखी परिक्रमा प्रतिवर्षी संबंध महाराष्ट्रात ८ महिन्यांसाठी आयोजिली जाते.

प्रतिवर्षी श्री गुरुपौणिमा उत्सव व वर्धापन दिन उत्साहात साजरा होतो. याचे औचित्य साधून १० दिवसांचे धर्मसंकीर्तन व. सांस्कृतिक कार्यक्रम साजरे होतात. यंदाच्या  वर्षी प्रथमच गुरुपौणिमेच्या पार्श्वभूमीवर दि. १५ जुलै २०१९ रोजी सायं. ६ वा. सदरचे राष्ट्रीय व राज्यस्थरीय पुरस्काराचा सन्मान सोहळा अन्नछत्राच्या प्रांगणात अक्कलकोट येथे संपन्न होत आहे. 
सदर सभारंभ श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट येथे पद्मश्री पंडित ह्रदयनाथ मंगेशकरजींच्या उपस्थितीत पार पडणार असून श्री यतीनजी शहा यांच्या अध्यक्षतेखाली श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ (ट्रस्ट) अक्कलकोटचे संस्थापक अध्यक्ष श्री. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसिद्ध निवेदक व सूत्रसंचालक श्री सुधीर गाडगीळ करणार आहेत.

श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ( ट्रस्ट), अक्कलकोट धर्मदाय न्यास गेली ३१ वर्षे अन्नदानाचे स्वामींचे कार्य अव्याहतपणे करीत आहे. राजघराण्याचा वारसा लाभलेले सन्मा. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले महाराज हे अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष असून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने मा. जन्मेजयराजे यांनी हे अन्नछत्र सुरु केले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाने आणि मार्गदर्शनामुळे हे धर्मदाय न्यास प्रगतीची नेत्रदीप वाटचाल करीत आहे. अन्नछत्र परिसरात अनेक आमूलाग्र बदल व सुधारणा झाल्या असून लक्षवेधी आहेत. लवकरच महाप्रसादगृहाची ५ मजली भव्य इमारत सुमारे ५० कोटी अंदाजित खर्चाची साकारणार आहे. सदर भव्य वास्तूत स्वामीभक्तांना अद्यावत सोयी सुविधा असणार आहेत. हे सर्व श्री स्वामींच्या कृपेने होत असून अन्नछत्र मंडळ हे न्यास म्हणजे श्री स्वामी समर्थांचा चमत्कार आहे. 

सदर पत्रकार परिषदेस पंडितजी सन्मश्री ह्रदयनाथजी मंगेशकर, राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार निवड eसमिती अध्यक्ष, सन्मा. श्री. जन्मेजयराजे विजयसिंहराजे भोसले, संस्थापक अध्यक्ष, श्री स्वामी समर्थ अन्न क्षेत्र मंडळ (ट्रस्ट), अक्कलकोट  सम्मा. श्री. अमोलराजे जन्मेजयराजे भोसले समवेत प्रमुख कार्यकारी विश्वस्त मा. श्री. अभय खोबरे, उपाअध्यक्ष  मा. श्री. लाला ठोड, खजिनदार, सम्मा. श्री. सुधीरजी गाडगीळ, ख्यातनाम निवेदक व सूत्रसंचालक पुणे,  प्रशांत भगरे आणि इतर मान्यवरही उपस्थित 

No comments:

Post a Comment